
जळगाव ः जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत पोदार स्कूल संघाने अंडर १४ गटात विजेतेपद पटकावले.
मागील पाच दिवसांपासून गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर सुरू असलेल्या आंतर शालेय जिल्हा स्तरीय फुटबॉल स्पर्धेत मनपा १४ वर्षांआतील गटात अंतिम सामना पोदार आणि ओरियन असा झाला. यात पोदार संघाने १-० ने विजय नोंदवत विजेतेपद संपादन केले. जिल्हास्तरीय १७ वर्षांखालील मुलींच्या मनपा गटात अंतिम सामना पोदार विरुद्ध बी यू एन रायसोनी यांच्यात झाला. त्यात अत्यंत धक्कादायक असा १ गोल करून रायसोनी संघाने विजेतेपद प्राप्त केले.
उर्वरित १७ वर्षांखालील मुलींच्या गटात अंतिम सामना रुस्तमजी विरुद्ध काकासाहेब पूर्णपात्रे चाळीसगाव यांच्यात झाला. यात रुस्तमजी संघाने १-० ने विजय नोंदवत विजेतेपद संपादन केले.
पारितोषिक वितरण समारंभ
तिन्ही गटातील विजयी व उपविजयी संघातील खेळाडूंना पदक देऊन जिल्हा फुटबॉल असोसिएशन व स्पोर्ट्स हाऊसतर्फे गौरविण्यात आले. डॉ अस्मिता पाटील, संघटनेचे सचिव फारुक शेख, ताहेर शेख, हिमाली बोरोले, कल्याणी आटोळे, रोहिणी सोनवणे यांच्या हस्ते ट्रॉफी व मेडल देऊन गौरविण्यात आले.
यावेळी ममता प्रजापत, वसीम रियाज, वसीम चांद, तौसीफ शेख, साबीर शेख, उदय फालक, पंकज तिवारी, हेमंत गोरे, के पी पवार आदींची उपस्थिती होती.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू
हितेश पाटील (पोदार स्कूल), अस्मा पांडे (बी यु एन रायसोनी स्कूल), हरी प्रिया महाजन (काकासाहेब पूर्णपात्रे स्कूल, चाळीसगाव).