राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्र पुरुष संघ उपविजेता

  • By admin
  • September 15, 2025
  • 0
  • 39 Views
Spread the love

महिला गटात महाराष्ट्र संघाला तिसरे स्थान 

छत्रपती संभाजीनगर ः गाझियाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने शानदार कामगिरी नोंदवत मुलांच्या गटात उपविजेतेपद पटकावले. महाराष्ट्राने मुलींच्या गटात तिसरे स्थान मिळवले. 

भारतीय सॉफ्टबॉल असोसिएशन अंतर्गत गाझियाबाद सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १५व्या वरीष्ठ पुरूष आणि महिला राष्ट्रीय सॉफ्टबॉल फेडरेशन कप स्पर्धा एचएलएम ग्रुप इन्स्टिट्यूट गाझियाबाद येथे नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत पंजाब पुरुष संघाने सुवर्ण पदक, महाराष्ट्र संघाने रौप्य तर मध्य प्रदेश संघाने कांस्य पदक प्राप्त केले. महिलांच्या गटात मध्य प्रदेश संघाने सुवर्ण, पंजाब संघाने रौप्य तर महाराष्ट्र संघाने कांस्य पदक प्राप्त केले.

या स्पर्धेतील विजेत्यांना आयपीएस अधिकारी फारुक आलम, डायरेक्टर अनुज अग्रवाल, धीरज शर्मा, एल. आर. मौर्य, सचिव डॉ प्रवीण अनावकर, सॉफ्टबॉल इंडिया टेक्निकल कमिटीचे चेअरमन मुकुल देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात पंजाब संघाने महाराष्ट्र संघास ३-० होमरनच्या फरकाने पराभूत केले.

अंतिम सामन्यात ऋत्विक कुडवे याने भेदक पिचिंग केली व कल्पेश कोल्हे याने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तसेच व्यंकटेश झिपरे, सौरभ टोकसे, अभिषेक सेलोकर यांनी पूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट हिटिंग करून सर्वांचे लक्ष वेधले. महिला खेळाडूंमध्ये महाराष्ट्र संघकडून करिष्मा कुडचे, प्रीती कांबळे, सई जोशी, रक्षा शिंदे यांनी उत्कृष्ट हिटिंग बरोबर अंजली पवार हिने पिचिंग करत संघाना विजय प्राप्त करून देण्यास महत्त्वाचे योगदान दिले.

या विजयी संघास प्रशिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी क्रीडा मार्गदर्शक किशोर चौधरी, आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक प्रा जयंत जाधव, दीपक खंदारे तर व्यवस्थापक म्हणून भीमा मोरे, चेतन चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. अंतिम सामन्यात शेषराज खेडकर, सुरेश रैना, विजेश कुमार, पवन कुमार, सुयोग कल्पेकर,एम बद्रीनारायण, शफनास एन यांनी पंचाची भूमिका निभावली.

या शानदार विजयाबद्दल महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष गिरीश महाजन, सचिव डॉ प्रदीप तळवेलकर,सहसचिव प्रशांत जगताप, गोकुळ तांदळे, देविदास पाटील, सुरजसिंग येवतीकर, रमाकांत बनसोडे, विकास टोणे, नितीन पाटील, दीपक रुईकर, गणेश बेटूदे आदींनी अभिनंदन केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *