
बजाजनगर ज्यूदो क्लब येथे स्पर्धेचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा ज्यूदो संघटना आणि बजाजनगर व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळाच्या श्रीमती परमेश्वरी देवानी ज्यूदो प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय ज्यूदो स्पर्धेत २१० खेळाडूंनी सहभाग घेऊन स्पर्धेत मोठी चुरस निर्माण केली आहे.
शालेय ग्रामीण जिल्हास्तरीय ज्यूदो स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, जिल्हा संघटनेचे सचिव अतुल बामनोदकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष भीमराज रहाणे, प्रसन्न पटवर्धन, विश्वजित भावे, विश्वास जोशी, जिल्हा संघटनेचे सहसचिव अशोक जंगमे, क्रीडा कार्यालयाचे रामकिशन मायंदे, सदानंद सवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेत एकूण २१० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. विजेत्या खेळाडूंना महाराष्ट्र राज्य ज्यूदो संघटनेचे सचिव दत्ता आफळे यांच्या हस्ते मेडल देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेतील स्पर्धा संचालक म्हणून भीमराज रहाणे काम पाहत आहेत.
विजेत्या खेळाडूंचे राज्य संघटनेचे सचिव दत्ता आफळे, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, रामकिशन मायंदे, लता लोंढे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अजित मुळे, सचिव अतुल बामणोदकर, विश्वजीत भावे, विश्वास जोशी, डॉ गणेश शेटकर, प्रसन्न पटवर्धन, भास्कर जाधव, भीमाशंकर नावंदे, झिया अन्सारी, विजय साठे, अमित साकला, सुनील सिरस्वाल, मनिंदर बिलवाल, दत्तू पवार, कुणाल गायकवाड, क्रीडा मंडळाचे नंदमूरी श्रीनिवास, मनोहर देवानी, अनिल पवार, नामदेव दौड, अभिजीत दळवी, भीमराज रहाणे, अशोक जंगमे, सुधीर काटकर, सागर घुगे, हर्षल महाजन, उषा अंभोरे, ऋतुजा सौदागर, सायली राऊत, सुप्रिया जंगमे यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
पदक विजेते खेळाडू
१४ वर्षातील मुली
सुवर्णपदक – आर्वी महापुरे, शारदा शेळके, आरोही जाधव, आराध्या जाधव, संस्कृती चौधरी, प्राची अधाने, राजश्री मुसळे.
रौप्य पदक – शिशीका ढगे, निशा वाघ, राखी पालेजा, यामिनी चौधरी, साधना बेडगे, आरोही राठोड.
कांस्यपदक – अंकिता चव्हाण, अमृता डी के, प्रियंका घाटोळे, हिंदुजा जगताप, श्रावणी डिके, अपूर्वा म्हसे, लावण्या गायकवाड, रुचिता बोरकर, दीक्षा त्रिभुवन, वैष्णवी खोकले, मंजुषा वाघमारे.
१४ वयोगट मुले
सुवर्णपदक – श्रेयस सोळंके, रितेश फुलारे, सुवर्ण दातरंगे, मयूर बनकर, साई कदम, सुयोग बडे, अब्दुल खान.
रौप्य पदक – अथर्व सोळंके, आरुष नागरे, युसुफ चाऊस, विराज पवार, सय्यद मुजकीर, रुद्र साळे.
कांस्यपदक – सोहम कंधारकर, कृष्णा तांबरे, आदित्य सोनवणे, अविनाश सुरवसे, सोहम पोपटकर, संकल्प साळवे, पार्थ दौंड, सय्यद अनस, श्रीहरी चिकणे, प्रथुश बोबडे.