
छत्रपती संभाजीनगर ः क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत अजिंक्य कैलास शिवणकर याने शानदार कामगिरी नोंदवली.
या चमकदार कामगिरीमुळे अजिंक्य शिवणकर याने १९ वर्षाखालील मुलांच्या गटात विभागीय कॅरम स्पर्धेसाठी आपले नाव निश्चित केले आहे. अजिंक्य शिवणकर हा अग्रेसर विद्यामंदिर या शाळेचा खेळाडू असून त्याला क्रीडा शिक्षक अभिजीत शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.