
ठाणे : सुषमा पाटील महाविद्यालय कामोठे येथे आयोजित करण्यात आलेल्या पनवेल महानगरपालिका जिल्हास्तरिय शालेय मुष्टियुद्ध स्पर्धेत न्यू पनवेल येथील डी ए वी शाळेच्या नेथन मॅथ्यू आणि बतुल साकरवालाने सुवर्ण पदकाची कमाई केली.
या दोघांनी अंतिम फेरीत आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंना नाॅक आऊट केले. हे दोघे सध्या आठवी इयत्तेत शिकत आहेत. आता आगामी होणाऱ्या विभागस्तरिय मुष्टियुद्ध स्पर्धेसाठी हे दोघे पात्र ठरले आहेत. डी ए वी न्यू पनवेल शाळेच्या क्रीडा शिक्षिका समिक्षा कायंदेकर यांचे मार्गदर्शन नेथन आणि बतुलला मिळाले. डी ए वी न्यू पनवेल शाळेचे प्रिन्सिपल सुमंथ घोष यांनी सुवर्ण पदक विजेत्या नेथन, बतुलचे खास अभिनंदन केले आहे.