
सायकलिस्ट फाऊंडेशनतर्फे मेडल देऊन सत्कार
छत्रपती संभाजीनगर ः सायकलिस्ट फाऊंडेशन छत्रपती संभाजीनगर या संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या १० दिवस सायकल, धावणे, चालणे या चॅलेंजमध्ये तब्बल ५५ लोकांनी भाग घेऊन हे दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले.
यामध्ये रोज एक-एक शहरातील गणपती मंदिराला जाऊन तेथे सेल्फी घेऊन ग्रूपवर पोस्ट करणे असे होते. यामध्ये शहरातील प्रसिद्ध गणपती, तसेच प्राचीन गणपती मंदिरांचा समावेश होता. कमीत कमी १० किलोमीटर सायकलिंग, ५ किलोमीटर धावणे किंवा चालणे असे या चॅलेंजचे स्वरूप होते.
या सर्व सायकलपटूंचा मेडल देऊन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ विजय व्यवहारे, आनंद सायकलचे संचालक संदीप वायकोस, डॉ अरुण गावंडे, डॉ प्रशांत महाले यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ सायकलिस्ट जयंत सांगवीकर, लक्ष्मण साळुंके, नारायण चकोर, मुख्याध्यापिका मीनाक्षी कडू, प्रसाद कोळेकर, मनीष जोशी, सचिन जोशी, सचिन गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
चॅलेंजमध्ये डॉ वैशाली धूत, प्रणिता बर्दापूरकर, अश्विनी सर्सांडे, विश्रांती गायकवाड, सर्वात लहान स्पर्धक तनय व्यवहारे, भगवान मगर, मनोज वडगावकर, अनिल टाकळीकर, प्रमोद सुर्वे, अनिल साळवे, राजकुमार बिराजदार, विवेक जोशी, संजय शिंदे, विलास चव्हाण, सय्यद रहीमोद्दीन, विकास गायकवाड, धनंजय भाले, सदानंद नागपूरकर, मल्लिकार्जुन स्वामी, गजानन पिसे, हेमंत भावसार, जयंत कुलकर्णी, मनोज जोशी, डॉ माधव गोंगे, डॉ संध्या गोंगे, अश्विनी गजभरे, राजेंद्र वाणेकर, प्रवीण शेजुल आदी ५५ सायकलपटूंनी सहभाग घेतला होता.