
छत्रपती संभाजीनगर ः एमपीपी स्पोर्ट्स पार्क आयोजित बॅडमिंटन स्पर्धेला बुधवारी (१७ सप्टेंबर) प्रारंभ होत आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी दहा वाजता महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे सचिव सिद्धार्थ पाटील, एमपीपी स्पोर्ट्स पार्कचे डायरेक्टर अॅड संघर्षण जोशी आणि डायरेक्टर गोपाल पांडे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
सदरील स्पर्धेत आतापर्यंत शंभर खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून उर्वरित खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी हिमांशू गोडबोले यांच्याशी संपर्क साधावा.