एरोबिक जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघास सर्वसाधारण विजेतेपद

  • By admin
  • September 16, 2025
  • 0
  • 26 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः सायना नेहवाल इनडोअर स्टेडियम, एर्नाकुलम येथे झालेल्या  २० व्या एरोबिक जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाने एकूण २२ पदकांची कमाई करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. 

भारतीय जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाने सर्व वयोगटांमध्ये चमकदार कामगिरी करत १५ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कांस्य अशी एकूण २२ पदकांची कमाई केली. तसेच २०व्या राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाने १४९ अंकांची कमाई करत राष्ट्रीय स्पर्धेमध्ये संघाने अव्वल स्थान मिळवले.

या स्पर्धेमध्ये डॉ मकरंद जोशी यांनी स्पर्धा प्रमुख म्हणून काम पाहिले. या स्पर्धेमध्ये पंच म्हणून सिद्धार्थ कदम, विवेक देशपांडे, ऋग्वेद जोशी यांनी कामगिरी बजावली. तसेच संघासोबत हर्षल मोगरे, निलेश जोशी, हर्षद कुलकर्णी, ईशा महाजन आणि श्रिया कुलकर्णी यांनी चोख कामगिरी बजावली. संघ व्यवस्थापक म्हणून देवेंद्र राजगुरू आणि दीपाली बजाज पार पाडली आहे. 

या संघाला महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष डॉ आदित्य जोशी, डॉ मकरंद जोशी, भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या उपसंचालक डॉ मोनिका घुगे, मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष राम पातूरकर, सचिव हेमंत पातूरकर, जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेचे कार्याध्यक्ष ॲड संकर्षण जोशी, उपाध्यक्ष डॉ रणजीत पवार, सचिव हर्षल मोगरे, कोषाध्यक्ष डॉ सागर कुलकर्णी, डॉ विशाल देशपांडे, अमेय जोशी, संदीप गायकवाड, राहुल तांदळे, रोहित रोंघे, साई केंद्राचे जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक संजय मोरे यांनी पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. 

पदक विजेते खेळाडू

नॅशनल डेव्हलपमेंट ः अंगद गावळी (कांस्य पदक), राही फुलतांबकर (कांस्य पदक), ओजस पाटील आणि लक्षिता डाभोलकर (रौप्य पदक), राही फुलतांबकर, इश्ती भटनागर, सिद्धी मारे (सुवर्ण पदक).

 युथ ग्रुप ः स्वराज गट्टूवार (सुवर्ण पदक), अवंतिका सानप (सुवर्ण पदक), अद्वैत काचेवर आणि अक्षया कलंत्री (सुवर्ण पदक), स्वराज गट्टूवार, सूर्या सौंदळे, अद्वैत काचेवर (रौप्यपदक). ग्रुप – ओम सोनी, श्रुती राऊत, अवंतिका सनाप, प्रणित बोडखे, सूर्या सौंदळे (सुवर्ण पदक).

एरो डान्स ः ओम सोनी, प्रसाद बिराजदार, दिती सारडा, आराध्या वजे, ईशिका बजाज, ऋधिमा आव्हाड, श्रावरी सारोटे, रिद्धी मेहता (सुवर्ण पदक).

 कनिष्ठ गट ः विश्वेश पाठक (सुवर्ण पदक), अनिकेत चौधरी (कांस्य पदक), गौरी ब्रह्मणे, विश्वेश पाठक, अनिकेत चौधरी (सुवर्ण पदक).

ग्रुप ः पुष्टी अजमेरा, अनुश्री गायकवाड, रिया नाफडे, सुहानी टायळ, सान्वी सौंदळे (सुवर्णपदक). 
एरो डान्स ः सान्वी सौंदळे, अनुश्री गायकवाड, निर्णय मुसरीफ, गौरी ब्रह्मणे, धनश्री खंडारे, कृतिकी हेकडे, जान्हवी रोंघे, पुष्टी अजमेरा (सुवर्ण पदक).
वरिष्ठ गट ः आर्य शाह (कांस्य पदक), मानसी देशमुख (कांस्य पदक)

मिश्र दुहेरी ः मानसी देशमुख आणि श्रीपाद हराळ (सुवर्ण पदक), राधा सोनी आणि अद्वैत वझे (रौप्य पदक).

मिश्र तिहेरी ः आर्य शाह, स्मित शाह, रामदेव बिराजदार (सुवर्ण पदक).
गट : उदय मढेकर, अद्वैत वझे, आर्य शाह, स्मित शाह, रामदेव बिराजदार (सुवर्ण पदक).

एरो डान्स : श्रेया लोढे, अदिती तळेगावकर, राधा सोनी, सायली वझरकर, संदेश चिंतलवाड, प्रथमेश मार्ग पवार, विश्वेश जोशी, अभय उंटवाल (सुवर्ण पदक).
एरो स्टेप : अभय उंटवाल, संकेत चिंतलवाड, दीपक अर्जुन, श्रीपाद हराळ, तनिष्क राजेगावकर, प्रेम बनकर, रोहन पगारे, संदेश चिंतलवाड (सुवर्ण पदक).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *