
छत्रपती संभाजीनगर ः मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरातील उदयोन्मुख खेळाडू वल्लभ कुलकर्णी याने खेळाडूंना चेस ब्लिट्झ सामना खेळण्याचे आव्हान दिले आहे.
यामध्ये आतापर्यंत २५ खेळाडूंनी आव्हान स्वीकारले आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात बुद्धिबळ खेळाची आवड आणि प्रसार करणे हा मुख्य हेतू यामागे आहे. तसेच नॉन स्टॉप २१ ब्लिट्झ खेळल्यास तो पण एक रेकॉर्ड होऊ शकतो. संपूर्ण देशभरात इतक्या कमी वयात (वय वर्ष ५) सलग २१ ब्लिट्झ सामने खेळणारा वल्लभ एकमेव खेळाडू असू शकतो. या सामन्याचे आयोजन छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रख्यात माय वर्ल्ड येथे बुधवारी सकाळी १० ते १ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.