
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये कार्यरत सर्व अंशकालीन कला, क्रीडा, कार्यानुभव निदेशांकाची सहविचार सभा वजलतरण साक्षरता संदर्भात कार्यशाळा डिफेन्स करिअर ज्युनियर कॉलेजच्या सभागृहात संपन्न झाली.
.
या कार्याशाळेत ५ जून २०२५च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने उपस्थित शिक्षकांनी आपली मते मांडून त्यात सुधारणा करण्या संदर्भात विचार मंथन झाले व पुढील दिशा ठरविण्यात आली. तसेच कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात जलतरण साक्षरते संदर्भात सविस्तर जाणून घेण्यासाठी उपस्थित शिक्षकांना जलतरण साक्षरतेची संकल्पना मांडणारे राजेश भोसले यांनी या कार्यशाळेला संबोधित करताना सांगितले की, कला, क्रीडा, कार्यानुभव या सारख्या महत्वपूर्ण व विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयांशी संबंधित असणाऱ्या शिक्षकांनी जलतरण साक्षरता हा महत्वपूर्ण विषय हातात घेणे अत्यंत गरजेचे आहे. मुळात कला, क्रीडा, कार्यानुभव हे विषय कृतिशील असल्या कारणाने विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील अंतर क्रिया, देवाण घेवाण इत्यादी गोष्टी अधिक घट्ट असतात. विद्यार्थ्यांच्या खेळ व इतर आवडी निवडीची अधिकची माहिती ही कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांना असते.
आपण जलतरण साक्षरतेचे महत्व अधिक चांगल्या प्रकारे समजून सांगू शकता आणि ही काळाची गरज आहे. आपण कला, क्रीडा व कार्यानुभव निदेशकांनी जलतरण साक्षरता राबविण्यासंबधी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे, असे राजेश भोसले म्हणाले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक राधेश्याम मिसाळ व यशवंत लोहारे यांनी केले. जलतरण साक्षरता संदर्भात अधिक जोमाने काम करण्यासाठी कला, क्रीडा, कार्यानुभव अंशकालीन शिक्षकांची एक जिल्हास्तरीय समिती व्हावी अशी इच्छा संदीप मुंडलिक यांनी व्यक्त केली. गंगाधर नागे,दादासाहेब बागुल, अली बाकोदा, प्रमोद जाधव, मुक्तेश्वर सोनवणे, माणिकराव आमटे, राजेंद्र दिवेकर, भगवान सवई, निलेश चावरे,
बाबासाहेब जाधव, सुनीता शेजूळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र झाल्टे यांनी केले तर सीमा चौधरी यांनी आभार मानले.