पुणे ः पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हा ग्रामीण आंतर शालेय बॉक्सिंग स्पर्धा (१७ वर्षे मुले व मुली) १८ सप्टेंबर व १९ सप्टेंबर रोजी जनरल अरुण कुमार वैद्य स्टेडियम, भवानी पेठ, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.
१८ सप्टेंबर रोजी मुले व १९ सप्टेंबर रोजी मुलींची स्पर्धा होणार असून पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील खेळाडू या स्पर्धेकरिता मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. अधिक माहितीसाठी पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे महासचिव अभिमान सूर्यवंशी (९९२२०८१०२२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष भरतकुमार व्हावळ यांनी केले आहे.