
यवतमाळ : येथील जायंट्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय हिन्दी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक योगेशसिंग चव्हाण हे होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे पर्यवेक्षक किरण फुलझेले हे होते.
सर्वप्रथम सरस्वतीचे पूजन पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन अनमोल राठोड हिने केले. अर्पिता तिवारी यांनी अतिथींचे स्वागत केले. शाळेचे प्राचार्य योगेशसिंह चौहान यांनी हिन्दी दिवसाचे महत्त्व सांगितले. श्रावणी जाधव, हर्षल सुकळे, हर्षित महल्ले, आस्था धांदे आणि वंशिका लाड यासारख्या विद्यार्थ्यांनी शाळेत आयोजित हिन्दी भाषण स्पर्धेत भाग घेतला.
विद्यार्थ्यांनी नृत्य अभिनय सादर केला. त्यात आराध्या गजापुर, चैताली कपिल, विधी मिश्रा, मानसी कुडवे, साधवी खंडारकर, माही कान्हेरकर आणि स्वराली राऊत यांचा समावेश आहे. शाळेचे संगीत शिक्षक अतुल तातावार आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय दिनानिमित्त हिन्दी गीत सादर केले. वेदश्री शहाडे, मनस्वी दुधणे आणि शिवान्या चव्हाण यांनी कविता व दोहे सादर केले या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या हिन्दी शिक्षिका हर्षदा काटेखांये, सीमा कट्टमवार आणि सर्व शाळेचे शिक्षकांनी सहभाग नोंदविला तर दहाव्या वर्गाच्या सुखदा देशपांडे हिने हिन्दी दिनाच्या निमित्ताने सर्वांचे आभार मानले.