राष्ट्रीय कराटे स्पर्धेत रुद्र अकादमीने जिंकली आठ पदके

  • By admin
  • September 18, 2025
  • 0
  • 20 Views
Spread the love

सोलापूर ः गोजू रियू कराटे डो मार्शल आर्टस असोसिएशनतर्फे आंध्र प्रदेश मधील कर्नूल येथे नुकत्याच झालेल्या बाराव्या खुल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत रुद्र ॲकॅडमी तसेच ट्रेडिशनल व स्पोर्ट्स कराटे असोसिएशनच्या कराटेपटूंनी पाच सुवर्ण, एक रौप्य व दोन कास्य पदके पटकावली.

शिवस्मारक येथे आंतरराष्ट्रीय कराटे ॲथलिट व ऑनलाईन कोच भुवनेश्वरी व अ स्तरीय डब्लूकेएफ पंच तसेच ऑफलाईन कोच मिहिर सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संचलित स्पोर्ट्स कराटे बॅचमध्ये अद्ययावत सराव करणाऱया सात कराटे ॲथलिटस्‌‍‍नी हे यश संपादित केले.

संगमेश्वर कॉलेजच्या आर्या यादव हिने कुमिते प्रकारात सुवर्ण, एमपीएसच्या अक्षिता कुलकर्णी हिने कुमिते प्रकारात सुवर्ण व काता प्रकारात रौप्य, संगमेश्वर कॉलेजच्या संकेत धन्नाईक व समिहान कुलकर्णी यांनी कुमिते प्रकारात प्रत्येकी एक सुवर्ण, दमाणी प्रशालेच्या ऋतुराज साठे याने कुमिते प्रकारात सुवर्ण, तर सिद्धेश्वर स्कूलच्या तन्मय बहिरवाडे याने कुमिते प्रकारात कांस्य व गांधीनाथा रंगजी स्पोर्ट्स प्रशालेच्या तेजस तुरेराव याने कुमिते प्रकारात कास्य पदकांची कमाई केली. “शिवस्मारक“चे सचिव गंगाधर गवसणे आणि रुद्र अकादमीच्या संचालिका व टीएसकेएच्या अध्यक्षा संगीता सुरेश जाधव यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *