
गेवराई ः महाराष्ट्र खो-खो संघटनेचे माजी सरचिटणीस ॲड गोविंद शर्मा यांची भारतीय खो-खो महासंघाचे खजिनदारपदी निवड झाल्यामुळे क्रिस्टॉल हॉटेल बीड येथे एमॅच्युअंर खो- खो असोसिएशन बीड व मराठवाड्यातील सर्व जिल्हा खो-खो संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला होता.
यावेळी महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सरचिटणीस डॉ चंद्रजीत जाधव, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा जे पी शेळके हे उपस्थित होते. या प्रसंगी डॉ चंद्रजीत जाधव आपल्या भाषणात म्हणाले की, गोविंद शर्मा यांच्या निवडीने महाराष्ट्रातील सर्व खो -खो खेळाडूंना योग्य तो न्याय मिळाला आहे व विविध राष्ट्रीय स्पर्धा आपल्या महाराष्ट्रात होतील. खो-खो खेळाच्या योगदानामध्ये गोविंद शर्मा यांचे खूप चांगले काम आहे. त्यांनी असेच पुढे प्रगती करावी, असेही ते म्हणाले.
प्रा जे पी शेळके यांनी गोविंद शर्माला अर्जुनाची उपमा दिली. कारण त्यांचा बाण योग्य दिशेने लागतो असे सर म्हणाले. हा कार्यक्रम डॉ पवन पाटील व डॉ रफीक शेख यांच्या संकल्पनेतून करण्यात आला. या प्रसंगी हिंगोली जिल्हा सचिव नागनाथ गजमल, परभणी जिल्हा सचिव डॉ पवन पाटील, संतोष सावंत, धाराशिव जिल्हा सचिव प्रवीण बागल, लातूर जिल्हा सचिव गोमारे, जालना जिल्हा सचिव डॉ रफिक शेख, छत्रपती संभाजीनगर जिल्हा सचिव विकास सूर्यवंशी, हिंगोली जिल्हा सचिव डॉ नागनाथ गजमल, नांदेड जिल्हा सचिव रमेश नांदेडकर, रणजीत जाधव, दीपक सपकाळ, राम चोखट, प्रभाकर काळे, अमोल मुटकळे, श्रीपाद लोहकरे, विवेक कापसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एमॅच्युअंर खो- खो असोसिएशन बीड अध्यक्ष ऋषिकेश शेळके, उपाध्यक्ष रमेश शिंदे, सचिव विजय जाहेर, योगेश सोळसे, प्रफुल हनवटे, रमेश पिसाळ, बंडू गोरड या सर्वांनी परिश्रम घेतले.