वुशु स्पर्धेत अनुश्री, तनुश्री, संचितला सुवर्णपदक 

  • By admin
  • September 18, 2025
  • 0
  • 15 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय वुशु स्पर्धेत अनुश्री घुगे, तनुश्री राठोड, संचित क्षीरसागर या खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले.

या स्पर्धेत अनुश्री प्रवीण घुगे हिने वजन गट ४८ किलो गटात अंडर १७ मध्ये सुवर्णपदक जिंकले. वजन गट ५२ किलोमध्ये तनुश्री राठोड हिने प्रथम आणि संचित क्षीरसागर याने वजन गट ७५ मध्ये प्रथम क्रमांक मिळवला. हे विद्यार्थी मिशन मार्शल आर्ट अकॅडमीचे खेळाडू आहेत आणि गेल्या तीन वर्षांपासून मार्शल आर्ट्सचा नियमित सराव करत आहेत.

अनुश्री घुगेची पुढील विभागीय वुशु स्पर्धेत निवड झाली आहे. अनुश्री ही पोदार इंटरनॅशनल स्कूल, सुंदरवाडी या शाळेची विद्यार्थी आहे. मिशन मार्शल आर्ट्स अँड वुशू कुंग – फु स्पोर्ट्स कराटे असोसिएशन इंडिया छत्रपती संभाजीनगर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पवन घुगे, सचिव व मुख्य प्रशिक्षक प्रवीण घुगे याचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभत आहे.

या अगोदर अनुश्रीने गोवा, मुंबई, हैदराबाद, काठमांडू येथे राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक पटकावले आहेत. या यशाबद्दल नभराज नंदनवन गृह सहकारी सोसायटीचे अध्यक्ष अजय घुगे, सचिव श्याम जिबकाटे, प्रशिक्षिका नंदा घुगे, राधा घुगे, आरती वाघ, पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका वैशाली जोशी, भक्ती गावकर, मिथुन रामगीरवार, रमेश शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, माजी क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, क्रीडा अधिकारी यादवराव, बंटी राठोड, महेश इंदापूरे, राम बुधवंत, शाम बुधवंत, राम चौरे, गौरव टोकटे, कोमल राठोड व पालकांनी अनुश्री घुगेचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *