राज्यस्तरीय मास्टर्स जलतरण क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न 

  • By admin
  • September 18, 2025
  • 0
  • 27 Views
Spread the love

३९७ मास्टर्स खेळाडूंचा सहभाग

छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्र स्टेट व्हेटरन्स ॲक्वेटिक असोसिएशन व मास्टर्स ॲक्वॅटीक असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २६ व्या राज्यस्तरीय मास्टर्स जलतरण स्पर्धा छत्रपती संभाजीनगरच्या महानगर पालिकेच्या सिद्धार्थ जलतरण तलावावर मोठ्या उत्साहात पार पडली.

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना मेडल्स व ट्राफी प्रदान करण्यात आली. प्रसंगी मास्टर्स ॲक्वॅटीक असोसिएशन छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष राजेश मेहता, उपाध्यक्ष उल्हास पटेल, सचिव मुकेश बाशा, ॲड मिरा बाशा तसेच महाराष्ट्र राज्य व्हेटरन्स ॲक्वाटीक असोसिएशनचे अध्यक्ष अरुण सावंत, सचिव  शेखर भावसार, मास्टर्स फेडरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बापू किनगावकर, फाऊंडर अध्यक्ष अरविंद शिरभाते, सतीश दवंडे आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत महाराष्ट्रातील ३९७ महिला व पुरुष स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजेश भोसले, राहुल डहाळे, अमोल झाल्टे, डॉ हिमानी बाशा, डॉ सुनील देशमुख, संजू सराफ, मनोज टोपीवाला, व्रज बाशा आदींनी परिश्रम घेतले. स्पर्धेच्या निमित्ताने ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहर पाहण्याची संधी मिळाली अशी भावना महाराष्ट्रातील इतर जिल्ह्या शहर व ग्रामीण भागातील आलेल्या खेळांडूनी व्यक्त केली व आयोजकांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *