
राष्ट्रीय पंचांचा सत्कार
रायगड ः जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अलिबाग यांच्या वतीने आयोजित रायगड जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा १६ व १७ सप्टेंबर रोजी पिल्लई एचओसीएल स्कूल, रसायनी येथे ॲमेच्युअर तायक्वांदो असोसिएशन ऑफ रायगड यांच्या सहकार्याने उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडली.
या स्पर्धेच्या नियोजनाची जबाबदारी संघटनेचे सचिव सचिन शंकर माळी व खजिनदार रोहित तानाजी सिनलकर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. स्पर्धेदरम्यान क्रीडा अधिकारी सुचिता ढमाले यांच्या हस्ते सर्व राष्ट्रीय पंचांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांनी जिल्हा संघटनेच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक केले.
दोन्ही दिवसांचे सामने अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. क्रीडा विभागाकडून आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. महात्मा एज्युकेशन सोसायटीचे एचओसी स्कूल, रसायनी येथील मुख्याध्यापिका रीमा निकाळजे व मॅनेजमेंट रिप्रेझेंटेटिव्ह आर बी पाटील यांनी स्पर्धेसाठी सर्वतोपरी सहकार्य केले.