छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाने ‘नशामुक्त भारत’ या घोषणेसह छत्रपती संभाजीनगर शहरात नमो युवा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. आयोजकांनी नागरिकांना मोठ्या संख्येने यात सहभागी होण्याचे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
ही मॅरेथॉन स्पर्धा २१ सप्टेंबर (रविवार) रोजी होणार आहे. ‘नशा मुक्त भारत’ या घोषासह विभागीय क्रीडा संकुलापासून सकाळी ६.३० वाजता सुरू होईल. विभागीय क्रीडा संकुलापासून सुरू होणारी ‘नमो युवा रन’ शाहनूर मिया दर्गा, रोपळेकर रुग्णालय, चेतक घोडा, जवाहरनगर पोलिस स्टेशन आणि सुतगिरणी चौक मार्गे विभागीय क्रीडा संकुलात परत येऊन समाप्त होईल. पॅरालिम्पिक जलतरणपटू अदिती निलंगेकर या स्पर्धेसाठी ब्रँड अम्बॅसॅडर म्हणून उपस्थित असणार आहे.
या नमो युवा मॅरेथॉन मधे धावण्यासाठी सहभागींना आगाऊ नोंदणी या लिंक https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScqhM9oj_QhRSNILXf1-UaMAP8G2WuC2lRD1XFpRu2ahM6hmA/viewform?usp=dialog
वर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर महिला व पुरुष गटात मॅरेथॉन मधे प्रथम येणाऱ्याला ५५५५ रुपये, द्वितीय येणाऱ्या ३३३३ तर तिसऱ्या क्रमांकाच्या धावपटूला २२२२ याचे रोख पारितोषिक दिले जाणार असून सर्व सहभागींना पदके, प्रमाणपत्रे, टी-शर्ट आणि अल्पोपहार ही देण्यात येईल. नमो युवा मॅरेथॉन च्या यशस्वीतेसाठी भाजपाचे तिन्ही जिल्ह्याचे अध्यक्ष किशोर शितोळे, सुहास शिरसाठ, संजय खंबाटे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल दांडगे, अमोल जाधव, ऋषी नरवडे तसेच या मॅरेथॉनचे संयोजक यज्ञेश बसेये परिश्रम घेत आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाने नागरिकांना मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
