
अंबाजोगाई ः तालुका क्रीडा संकुलाच्यावतीने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत गोदावरी कुंकूलोळ योगेश्वरी कन्या शाळेच्या आठ खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. त्यांची निवड जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी झाली आहे.
या स्पर्धेत अवंती लोमटे, भक्ती देशमुख, दर्शना मंत्री, अनुष्का रामरुळे, आदित्य गाढवे, श्रुती चव्हाण, प्रेरणा मंत्री, आर्या केकाण यांनी चमकदार कामगिरी नोंदवली. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक अंजली रेवडकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर, सचिव कमलाकरराव चौसाळकर, सहसचिव ॲड कल्याणी विर्धे, मुख्याध्यापिका मीना कुलकर्णी, स्मिता धावडकर, लता सरवदे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.