
मुंबई ः मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे अंडर १६ मुलांचा क्रिकेट संघ जाहीर करण्यात आला आहे. अद्वैत भट हा संघाचा कर्णधार आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या १६ वर्षांखालील निवड समितीमध्ये मंदार फडके (अध्यक्ष), जुड सिंग, सुधाकर हरमलकर, अमोल भालेकर आणि जयप्रकाश जाधव यांचा समावेश आहे. त्यांनी बडोदा येथे होणाऱ्या १६ वर्षांखालील जे वाय लेले ट्रॉफी २०२५-२०२६ मध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खालील खेळाडूंची निवड केली आहे.
मुंबई अंडर १६ संघात अद्वैत भट (कर्णधार), अरहान पटेल, अर्जुन गडोया, समृद्ध भट, युग असोपा, हर्ष कदम, शोण कोरगावकर, ऋषभ सदके, देवाशिष घोडके, इशान पाठक, शेन रझा, सिद्धांत जाधव, अझरन सोलंकी, शिव त्रिपाठी, विराट यादव, विवान जोबनपुत्रा, युवराज पाटील, धैर्य म्हात्रे यांचा समावेश आहे अशी माहिती सचिव अभय हडप व सहसचिव दीपक पाटील यांनी दिली.