
आंतर महाविद्यालयीन तलवारबाजी स्पर्धा
छत्रपती संभाजीनगर ः आंतर महाविद्यालयीन तलवारबाजी स्पर्धेत कशिश भराड, वैदेही लोहिया, सपना मारग यांनी आपापल्या प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व वसंतराव नाईक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालय तलवारबाजी स्पर्धेचे उद्घाटन वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नितीन राठोड यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी राज्य सरचिटणीस डॉ उदय डोंगरे, प्राचार्य डॉ संजय शिंदे, डॉ पांडुरंग रणमाळ, डॉ संदीप जगताप, सीमा वडते, शैलेश चव्हाण, डॉ दिनेश वंजारे, स्वप्नील शेळके, महेश तवार, स्वप्नील तांगडे, तुषार आहेर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सागर मगरे यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ सत्यजित पगारे, प्रा सागर मगरे, प्रा हर्षदा वंजारे, विश्वजीत कुलकर्णी, अमृता भाटी यांनी पुढाकार घेतला आहे.
अंतिम निकाल
फॉईल ः १. वैदेही लोहिया, २. वैष्णवी दुसंगे, ३. कोमल बगडे, ४. पौर्णिमा गबने.
इप्पी मुली ः १. सपना मारग, २. वेदिका गोडलकर, ३. धनश्री पेंढारे, ४. साक्षी तोताडे.
सेबर मुली ः १. कशिश भराड, २. हर्षदा वंजारे, ३. खुशाली माढाकार, ४. तेजश्री सोळुंके.