
नांदेड ः सांगलीची आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू श्रेया हिप्पारगी हिने नांदेड येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले.
या यशामुळे तिची १६ ते २४ डिसेंबर दरम्यान झारखंड येथे होणाऱ्या ३९व्या राष्ट्रीय ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिने आठ पैकी ७ गुण मिळवत निर्विवादपणे वर्चस्व प्रस्थापित केले. सध्या राजारामबापू पाटील माध्यमिक प्रशाला व ज्युनिअर कॉलेज संख या शाळेत दहावीत शिकत असलेल्या श्रेया हिप्परगी हिला प्रशिक्षक सुमुख गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले आहे.