
अशोक जैन, रवींद्र नाईक, देबासीस दास, ए टी राजीव यांच्या हस्ते पदके प्रदान
जळगाव ः सीआयएससीई सहाव्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी आघाडी घेत एकूण १९ पदके पटकवली. त्यात १० सुवर्ण, ४ रौप्य आणि ९ कांस्य पदकांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे स्पर्धेचे आयोजक असलेल्या जळगावच्या अनुभूती स्कूलच्या तीन विद्यार्थीनींनी पदके मिळवत महाराष्ट्राच्या वर्चस्वात मोलाची कामगिरी बजावली. विजेत्या खेळाडूंना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, अनुभूती स्कूलचे प्राचार्य देबासीस दास, आंतरराष्ट्रीय पंच ए टी राजीव यांच्या हस्ते पदके प्रदान करण्यात आली.
सीआयएससीई सहावी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेला अनुभूत स्कूल येथे १६ सप्टेंबर रोजी सुरुवात झाली होती. १९, १७ आणि १४ वर्षांखालील गटातील या स्पर्धेत देशभरातून ३०० पेक्षा अधिक विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत १४ वर्षाच्या गटात सर्वोत्तम खेळाडू महाराष्ट्रातील दिशा मेहता ठरली. १७ वर्षाच्या गटात कर्नाटक आणि गोवामधील पूर्विका एम हिने सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावला.
१९ वर्षाखालील गटात उत्तर प्रदेशची दिवा गुप्ता हिची सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली. १९ वर्षांआतील वयोगटातील स्पर्धेत जळगावच्या अनुभूती स्कूलची अलेफिया शाकीर हिने ६८ किलो वजन गटात कांस्यपदक मिळवले. तसेच ४९ किलो गटात अनुभूती स्कूलची समृद्धी कुकरेजा हिला कांस्यपदक मिळवले. अनुभूती स्कूलच्या पलक सुराणा हिलाही रौप्य पदक मिळाले.
राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रमुख अरविंद देशपांडे आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक अजित घारगे, जयेश बाविस्कर, महेश घारगे, रवींद्र धर्माधिकारी, प्रवीण ठाकरे, समीर शेख, मोहम्मद फजल, सुयश बुरकूल, किशोर सिंग, वाल्मिक पाटील, सोनाली हटकर, घनश्याम चौधरी, उदय सोनवणे, राहुल निभोंरे, सैय्यद मोहसीन, अब्दुल मोसीन जब्बार, योगेश धोंगडे, दीपिका ठाकूर यांनी परिश्रम घेतले.