
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर शहरात नुकत्याच झालेल्या शालेय जलतरण स्पर्धेत कन्नड तालक्यातील चिखलठाण येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. या कामगिरीमुळे त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शालेय जलतरण स्पर्धेत सोहम काटकर, अजिंक्य भोंगाळ, सार्थक चव्हाण, आदित्य चव्हाण, सार्थक चव्हाण, वैभव चव्हाण आणि किरण मोरे यांनी शानदार कामगिरी बजावत यश संपादन केले. वॉटर पोलो प्रकारात अर्णव चव्हाण, जयेश कांचर, सुदर्शन कांचर, सर्वज्ञ चव्हाण, सार्थक चव्हाण, अजिंक्य भोंगाळ, सुमित जाधव, सोहम काटकर, आदित्य चव्हाण, वैभव चव्हाण, शिवराज चव्हाण, यश विखणकर व किरण मोरे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विभागीय स्तरावर प्रवेश मिळवला.
ज्यूदो स्पर्धेत अजिंक्य भोंगाळ याने विभागीय पात्रता मिळवली आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत सर्वज्ञ चव्हाणने तृतीय क्रमांक, तर मुलींच्या गटात मेघा काटकरने द्वितीय आणि दिव्या कोरडे व भाग्यश्री नागणे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक विजयसिंग बारवाल यांचे मार्गदर्शन लाभले आहे. मुख्याध्यापक हुलराम चिंतलवाड, विनोद पवार, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष प्रवीण साबळे व सर्व सदस्य तसेच शिक्षक विनोद सोनवणे, भानुदास पांडव, चंद्रकांत ब्राम्हणे, भावेश पाटील, राजेंद्र भोसले, राजेंद्र शेलार, ज्ञानेश्वर इस्थापे, गणेश गाडे, संतोष पवार, तसेच शिक्षिका कांता काळे, स्मिता बाविस्कर, दीपाली माडेकर, प्रिया ठाकूर व तारा गांगुर्डे, दीपा पवार यांनी सर्व विजेत्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.