कोपरखैरणे : जिल्हास्तर शालेय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी क्राईस्ट अकॅडमी, कोपरखैरणे शाळेचे मुला व मुलींचे विविध वयोगटातील संघ जाहीर करण्यात आले आहेत.
१४ वर्षांखालील गटात कर्णधारपदी वीर पाटील व अंजली मंडलिक, १७ वर्षांखालील गटात कर्णधारपदी अद्वैत वेताळ व आर्या आचरे तर १९ वर्षांखालील गटात कर्णधारपदी स्वस्तिक पांगुल व आर्या बरदाडे यांची निवड झाली आहे.
१४ वर्षाखालील मुले संघामध्ये वीर पाटील (कर्णधार), आराध्य बेलदार, आरव पांधी, प्रथमेश तुपे, स्वराज पोफळे यांचा समावेश आहे. १४ वर्षाखालील मुली संघात अंजली मंडलिक (कर्णधार), युवराज्ञी दरेकर, ग्रीषा पाताडे, अनन्या नेमान व लावण्या भोर यांचा समावेश आहे.
१७ वर्षाखालील मुले संघ अद्वैत वेताळ (कर्णधार), दक्ष पार्टे, साई वाळुंज, राजवीर वरेकर व आदित्य भोर यांनी सजला आहे. १७ वर्षाखालील मुली संघात आर्या आचरे (कर्णधार), प्राची पार्टे, समृद्धी काळुखे, सेजल पवार व रावी परिहार यांचा समावेश आहे.
१९ वर्षाखालील मुले संघामध्ये स्वस्तिक पांगुल (कर्णधार), यश शिंदे, नैतिक खोराटे, प्रीत धोंदे व जयेश पाटील आहेत. १९ वर्षाखालील मुली संघात आर्या बरदाडे (कर्णधार), तपस्या माने, धनश्री पवार, वैदेही वांगडे व प्राची सिंह या खेळाडूंची निवड झाली आहे.
या सर्व संघांना प्रशिक्षक वैभव शिंदे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. शाळेचे संचालक फादर जेसन व मुख्याध्यापक फादर जिंटो यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सर्व समन्वयक, शिक्षक व पालक यांनीही संघाला स्पर्धेसाठी यशस्वी कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
शाळेच्या क्रीडा विभागामार्फत सातत्याने घेतल्या जाणाऱ्या सरावामुळे हे खेळाडू जिल्हास्तरावर नक्कीच उत्तम कामगिरी करून शाळेचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.