
कन्नड ः खेळाडूंना प्रोत्साहन देण्याबरोबरच युवा पिढीमध्ये खेळाची रूची वाढावी यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर राज्यात गुणवंत खेळाडू तयार होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणार असून छत्रपती संभाजीनगर व्हॉलीबॉल संघटनेचे सदस्य मार्गदर्शक प्रवीण शिंदे यांनी येथे सांगितले.
कन्नड तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या कृष्णा इंटरनॅशनल स्कूल येथे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या स्पर्धा जिल्हा क्रीडा कार्यालय व कृष्णा इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आल्या होत्या. तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत वयोगट १४, १७, १९ वयोगट मुले व मुली यांचे सामने कृष्णा इंटरनॅशनल येथे संपन्न झाले.
या स्पर्धेत एकूण ३४ संघांनी सहभाग नोंदवला. यावेळी क्रीडा संयोजक मुक्तानंद गोस्वामी, कृष्णा इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष सचिन पवार, शाळेच्या मुख्य प्रमुख वसुंधरा पवार, क्रीडा मार्गदर्शक अविनाश काळे, राकेश निकम आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचे पंच म्हणून विशाल दांडेकर, एजाज शहा, करण राठोड, वसीम शेख, रवी कुमार, सोनकांबळे, राहुल दणके, कडुबा चव्हाण यांनी काम पाहिले.