
मुंबई ः मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे डॉ भारती घनश्याम ढोकरट यांना क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित सैनी, उपायुक्त डॉ प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी सुजाता खरे, उपशिक्षणाधिकारी कीर्तीवर्धन किरत कुडवे, वरिष्ठ पर्यवेक्षक शारीरिक शिक्षण दत्तू लवटे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

हा कार्यक्रम पेंग्विन सभागृह भायखळा, मुंबई येथे नुकताच झाला आहे. शारीरिक शिक्षण विभाग क्रमांक १३ चे शारीरिक शिक्षण शिक्षक व कनिष्ठ पर्यवेक्षक यांच्या उपस्थितीत डॉ भारती ढोकरट यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी कनिष्ठ पर्यवेक्षक रघुनाथ सोनवणे, किरण इंगळे, चंद्रकांत घोडेराव, शारीरिक शिक्षण शिक्षक केशव बोरकर, एकनाथ वरकुटे, मिलिंद संदनशिव, स्मिता पोतदार, रमेश बोडके, संदेश जुईकर, प्रणिता क्षीरसागर, सुवर्णा खुडे, सुनीता पन्हाळे, कुंडलिक लाडे, डॉ जितेंद्र लिंबकर आदी मान्यवर उपस्थित होते. चेंबूर नाका शाळेच्या मुख्याध्यापिका संकुल प्रमुख इंद्रजीत कौर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. चेंबूर नाका शाळेच्या बँड पथकाने सदर कार्यक्रमाची शोभा वाढवली.