मुंबई ः राज्य खो-खो संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख, पदाधिकारी, खो-खो संघटक आणि दैनिक स्पोर्टस प्लसचे मुंबई प्रतिनिधी बाळ तोरसकर यांचे चिरंजीव वियोम तोरसकर यांचे शुक्रवारी सकाळी त्यांच्या माटुंगा येथील राहत्या घरी सकाळी साडे दहाच्या सुमारास निधन झाले. निधन समयी तो २४ वर्षांचा होता. गेले काही महिने तो आजारी होता. ऑगस्ट महिन्यात वियोमला काही दिवस हिंदुजा रुग्णालयामध्ये ठेवण्यात आले होते. शिवाजी पार्क येथील स्मशान भुमीत त्यांच्या पार्थिवावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी खो-खो खेळातील आजी माजी खेळाडू, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
बाळ तोरसकर यांना पुत्रशोक
-
By admin
- September 20, 2025
- 0
- 96 Views
You Might Also Like
-
November 9, 2025
शालेय स्क्वॉश स्पर्धेत मुद्दसिर पटेलला कांस्यपदक
-
November 9, 2025
महाराष्ट्रात बॉक्सिंगचा सुवर्णकाळ सुरू होण्याची चिन्हे
-
November 9, 2025
सतीश-शिरीष यादव पित्रा-पुत्रांची ऐतिहासिक कामगिरी



