
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रायझिंग स्टार इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी नोंदवत घवघवीत यश संपादन केले आहे.
विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या १४ वर्षांखालील मुलींच्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत २० ते २३ वजन गटात समृद्धी रामेश्वर मानकापे हिने सुवर्ण पदक तर विवेक रवींद्र जाधव याने ३० ते ३३ या वजन गटात रौप्यपदक प्राप्त केले. तसेच १७ वर्षांखालील मुलांच्या बॉक्सिंग स्पर्धेत श्रेयस दत्ता गायकवाड याने रौप्यपदक प्राप्त केले.
या खेळाडूंना प्रशिक्षक आणि क्रीडा शिक्षक संतोष आवचार यांचे मार्गदर्शन लाभले. या विजयाबद्दल संस्थेचे सचिव अरुण निकम व मुख्याध्यापिका दीपाली वाकळे यांच्या हस्ते तीनही खेळाडूंना पदके देऊन गौरविण्यात आले. तसेच तेजरावजी पाटील बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाष निकम, स्वाती निकम, उपमुख्याध्यापक संदीप चव्हाण, अतुल निकम, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.