
राज्य स्पर्धेत पटकावली दोन सुवर्णपदक
छत्रपती संभाजीनगर ः पुणे येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ गट अजिंक्यपद मैदानी स्पर्धेत जयहिंद विद्यालय बाभूळगावची माजी नामवंत धावपटू अमृता सुकदेव गायकवाड हिने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत २० वर्षांखालील मुलींच्या गटात ८०० व १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत दोन सुवर्णपदके पटकावली.
या क्रीडा प्रकारात अशी कामगिरी करणारी अमृता ही जिल्ह्यातील पहिलीच खेळाडू ठरली आहे. तिने हे सुवर्ण यश पुणे व कोल्हापूरच्या दिग्गज खेळाडूंवर चुरशीच्या शर्यतीत मात करत मिळवले आहे. या कामगिरीच्या जोरावर तिची १० ते १४ ऑक्टोबर दरम्यान भुवनेश्वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय कनिष्ठ गट अजिंक्यपद मैदानी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. ही बाब बाभूळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी भूषणावह आहे.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून जयहिंद विद्यालय बाभूळगाव येथे अमृता गायकवाडचा आई-वडिलांसह क्रीडा शिक्षक सतीश पाटील, सहशिक्षक गणेश जाधव, शालेय समितीचे पदाधिकारी, बाभूळगावच्या वतीने तीन हजार तीनशे रुपये रोख पारितोषिके शाल व स्मृतीचिन्ह शेख नूरभाई तसेच शालेय समितीचे पदाधिकारी, मुख्याध्यापक यांच्या हस्ते देवून भव्य सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सतीश पाटील यांनी अमृताच्या क्रीडा विषयक कारकिर्दी बाबत सांगताना शालेय राज्य मैदानी स्पर्धेसह अनेक मॅरेथॉन, क्राॅस कंट्री स्पर्धेत विजेतेपद पटकावले असून प्रतिष्ठेच्या टाटा मुंबई इंटरनॅशनल मॅरेथॉन (जानेवारी २०२४) मध्ये १० किलोमीटर शर्यतीत महिलांच्या ओव्हर ग्रुप मध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. आणि आता दोन सुवर्ण पदके पटकावण्याची किमया तिने केली आहे. अशी भरीव कामगिरी उत्तरोत्तर अमृताकडून घडत राहो हिच सदिच्छा.
अमृताने आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले मला शाळेतून खेळाचे बाळकडू सतीश पाटील सरांकडून मिळाले. जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांना खेळाच्या सरावासाठी वेळ द्यावा असे अहवान करत मी निश्चितच राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्यासाठी कसोशीने प्रयत्न करेल. माझा सत्कार केल्याबद्दल आभार व्यक्त केले आणि असेच भक्कमपणे पाठीशी उभे रहावे अशी इच्छा व्यक्त केली.
शेतकरी कष्टकरी कुटुंबात जन्मलेल्या अमृताने कठोर मेहनतीच्या जोरावर विपरीत परिस्थितीवर मात करत एक-एक यशाचे शिखरे गाठत आहे. तिच्या कठोर मेहनतीला राष्ट्रीय स्पर्धेत ही सुवर्णमय यश मिळो हिच सदिच्छा. अमृताची राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाल्याबद्दल संस्थाध्यक्ष कल्याणराव पाटील, विश्वनाथ पाटील, शेख नूरभाई, शालेय समिती अध्यक्ष भाऊसाहेब तुपे, इम्रान शेख, डॉ विशाल तुपे, मुख्याध्यापक पंकज बोरणारे, अरुण अकोलकर, सतीश पाटील, गणेश जाधव, लक्ष्मीकांत लिंबोरे, शैलेश भालेराव, अनिकेत तुपे, रिझवान शेख, अविनाश गायकवाड यांच्यासह गावकऱ्यांनी अभिनंदन करुन राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.