
नंदुरबार ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षांखालील मुले व मुली या गटातील अनेक खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धेत दि नवापूर एज्युकेशन सोसायटी संचलित, दि एन डी अँड एम वाय सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच जे शाह कनिष्ठ महाविद्यालय, नवापूर येथील खेळाडू हर्ष चावला याने ७० किलो वजन गटात सहभाग नोंदविला. आत्मविश्वास, जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर खेळ सादर करताना हर्ष याने प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत अंतिम फेरीत उल्लेखनीय विजय संपादन केला. या विजयानंतर त्याची निवड विभागस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी झाली आहे.
हर्षच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विपिन चोखावाला, उपाध्यक्ष शिरीष शाह, कार्याध्यक्षा शितलन वाणी, सचिव राजेंद्र भाई अग्रवाल, सहसचिव शोएब मांदा, कोषाध्यक्ष सतीश शाह, व्यवस्थापन मंडळातील सर्व सदस्य तसेच शाळेचे मुख्याध्यापक संजयकुमार जाधव, उपमुख्याध्यापिका कमल परिख, उपप्राचार्य नरेंद्र पाटील, पर्यवेक्षिका निजला सोनवणे व पर्यवेक्षक जाहीद खान पठाण, तसेच क्रीडा शिक्षक निलेश गावंडे व श्रीकांत पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले व विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.