
जळगाव ः मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा मुक्ताईनगर तालुक्याचा खेळाडू शुभम डापके याने ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत रौप्यपदक पटकावले.
या इव्हेंटमध्ये पुण्याच्या धुलादेव घागरे याने ९:०७.३६ वेळ देत सुवर्णपदक पटकावले. जळगावचा शुभम डापके याने ९:१४.१४ वेळ देत रौप्यपदक तर नागपूरचा प्रणय माहुले याने ९:१८.३८ वेळ देत कांस्यपदक पटकावले.
शुभम याचे या यशाबद्दल केंद्रीय राज्य क्रीडा मंत्री रक्षाताई खडसे, आमदार राजुमामा भोळे, आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे, जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ नारायण खडके, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, मनपा क्रीडा अधिकारी दिनानाथ भामरे, जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे चेअरमन एम वाय चव्हाण, कार्याध्यक्ष डॉ पी आर चौधरी, उपाध्यक्ष प्रा इकबाल मिर्झा, डॉ विजय पाटील, सचिव राजेश जाधव, मुक्ताईनगर तालुका क्रीडा अधिकारी नितीन जंगम, मुक्ताईनगर तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ प्रतिभा ढाके, सचिव अनिल चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.