
सोलापूर ः अहमदाबाद येथे २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत होणाऱ्या ११व्या एशियन जलतरण चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी सोलापूरच्या तीन डायव्हिंग प्रशिक्षकांची पंच म्हणून निवड झाली आहे. श्रीकांत शेटे, मनीष भावसार व हरिश अन्नलदास हे निवड झालेले तिघे पंच आहेत.


प्रशिक्षक श्रीकांत शेटे हे वीर सावरकर जलतरण तलावावर डायव्हिंगचे प्रशिक्षण देतात. मनीष भावसार व हरीश अन्नलदास हे मार्कंडेय जलतरण तलावावर खेळाडू घडवितात. भावसार हे पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीणचे पीएसआय आहेत. अन्नलदास हे मध्य रेल्वेत सेवेत आहेत. ते रेल्वेच्या खेळाडूंना डायव्हिंगचे प्रशिक्षण देतात.