
नशा छोडो, राष्ट्र जोडाचा नारा देत धावले हजारो शहरवासीय
छत्रपती संभाजीनगर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित नमो युवा रन मध्ये शहरातील धावपटू, नागरिकांनी दणदणीत सहभाग नोंदवला. रविवारी (२१ सप्टेंबर) सकाळी साडेसहा वाजता आयोजित या स्पर्धेत ‘नशा छोडो राष्ट्र जोडो’ ही घोषणा देत नाश मुक्त भारताकडे एक दमदार पाऊल टाकल्याचे चित्र विभागीय क्रीडा संकुलात पाहायला मिळाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नमो युवा रनचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन विभागीय क्रीडा संकुल येथे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आमदार संजय केनेकर, संजय कोडगे, प्रवीण घुगे, बापू घडामोडे, बसवराज मंगरुळे, किरण पाटील यांच्यासह स्पर्धेच्या ब्रँड अँबॅसेडर अदिती निलंगेकर, राज्य ॲथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष पंकज भारसाखळे यांची विशेष उपस्थिती होती. या स्पर्धेत शहर आणि जिल्ह्यातील दहा हजारांवर स्पर्धकांनी सहभाग नोंदवत नशा मुक्तीचा जयघोष केला.
या स्पर्धेतील सहभागींनी विभागीय क्रीडा संकुलापासून जवाहर नगर पोलिस ठाणे, चेतक घोडा, शहानुर मियाँ दर्गा चौक आणि परत विभागीय क्रीडा संकुल अशी धाव पूर्ण केली. या स्पर्धेत महिला धावपटूंचा लक्षणीय सहभाग होता. स्पर्धेत सहभागी झाल्या स्पर्धकांना टी-शर्ट, मेडल, प्रमाणपत्र आणि अल्पोपहाराची सुविधा या निमित्ताने उपलब्ध करुन देण्यात आली होती.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भाजपाचे अध्यक्ष किशोर शितोळे, सुहास शिरसाठ, संजय खंबायते, डॉ उज्वला दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल दांडगे, अमोल जाधव, ऋषी नरवडे, यज्ञेश बसैये, पवन सोनवणे व जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे फुलचंद सलामपुरे, दयानंद कांबळे, अमृत बिऱहाडे, राम जाधव, राहुल अहिरे यांनी परिश्रम घेतले. महिला व पुरुष गटातील पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी ५५५५, ३३३३, २२२२ रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
दौड सुरू होण्याआधी चैतन्यपूर्ण वातावरणात सहभागी हजारो नागरिकांचा वॉर्म अप रिलॅक्स झीलच्या संचालिका माधुरी पाटील यांच्या समूहाच्या वतीने घेण्यात आला. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ताराचंद गायकवाड यांनी केले.
स्पर्धेचा निकाल
महिला गट ः प्रथम : अमृता गायकवाड, द्वितीय : मनीषा पडवी, तृतीय : प्रियांका ओकशा.
पुरुष गट ः प्रथम : वैभव शिंदे, द्वितीय: अंगद कान्होर.