
शाकिब अल हसनचा विक्रम एकाच झटक्यात मोडला
दुबई ः बांगलादेश क्रिकेट संघाने एका रोमांचक सामन्यात श्रीलंकेच्या क्रिकेट संघाचा चार विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने १६८ धावा केल्या. त्यानंतर बांगलादेश संधाने शेवटच्या षटकात लक्ष्य गाठले. बांगलादेशकडून सैफ हसन आणि तौहिद हृदयॉय यांनी अर्धशतके झळकावली. लिटन दासनेही चांगली फलंदाजी केली आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
बांगलादेशकडून लिटन दास चमकला
बांगलादेशकडून कर्णधार लिटन दास तिसऱ्या क्रमांकावर आला आणि त्याने १६ चेंडूत २३ धावा केल्या, ज्यामध्ये तीन चौकारांचा समावेश होता. यासह, तो बांगलादेशचा टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आणि नंबर वन स्थान निश्चित केले. लिटन दासने आता टी-२० क्रिकेटमध्ये २,५५६ धावा केल्या आहेत, ज्याने शाकिब अल हसनचा विक्रम मोडला. शाकिबने बांगलादेशसाठी टी-२० क्रिकेटमध्ये एकूण २,५५१ धावा केल्या होत्या.
लिटन दासने २०१५ मध्ये बांगलादेशसाठी टी-२० मध्ये पदार्पण केले. तेव्हापासून त्याने ११४ टी-२० सामन्यांमध्ये एकूण २,५५६ धावा केल्या आहेत, ज्यात १५ अर्धशतके आहेत. कर्णधारपद मिळाल्यापासून त्याच्या फलंदाजीत लक्षणीय सुधारणा झाली आहे आणि त्याने चांगली कामगिरी केली आहे.
२०२५ च्या टी-२० आशिया कपच्या सुपर ४ मधील हा बांगलादेशचा पहिला सामना होता आणि या विजयामुळे त्यांना दोन गुण मिळाले. त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत. बांगलादेश २४ सप्टेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध आणि २५ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळेल.