
दुबई ः आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तान संघाचा सहा विकेट राखून मोठा पराभव केला. या स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानला दुसऱयांदा पराभूत केला. या विजयात अष्टपैलू हार्दिक पंड्या याने एक विक्रम रचला आहे.
हार्दिकने भुवनेश्वर कुमारचा विक्रम मोडला
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याने तीन षटकांत एकूण २९ धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. त्याने स्फोटक फलंदाज फखर झमानला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सामन्यात एक विकेट घेत हार्दिकने भुवनेश्वर कुमारचा विक्रम मोडत टी-२० आशिया कपमध्ये भारतीय गोलंदाजाकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे.
हार्दिक पंड्याने आता टी-२० आशिया कपमध्ये एकूण १४ विकेट्स घेतल्या आहेत. भुवनेश्वर कुमारने टी-२० आशिया कपमध्ये एकूण १३ विकेट्स घेतल्या होत्या. हार्दिकने आता टी-२० आशिया कपमध्ये बळी घेण्याच्या बाबतीत सर्व भारतीय गोलंदाजांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे.
टी २० आशिया कपमध्ये सर्वाधिक बळी घेणारे भारतीय गोलंदाज
हार्दिक पंड्या – १४ बळी
भुवनेश्वर कुमार – १३ बळी
कुलदीप यादव – ९ बळी
जसप्रीत बुमराह – ९ बळी.