शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांचे आश्वासन
नाशिक ः शिक्षण व्यवस्थेमध्ये इतर विषयांच्या बरोबर शारीरिक शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. या विषयामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होते. सुदृढ समाज निर्मिती, ऑलिम्पिकचे पदके, सक्षम राष्ट्रनिर्मितीसाठी या विषयांची अत्यंत निकड आहे आणि या विषयाच्या शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांची मालेगाव या ठिकाणी निवासस्थानी महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघा वतीने निवेदन देण्यात आले.
शारीरिक शिक्षण शिक्षकांचे मार्गदर्शक अमोल जोशी, स्वप्नील करपे तसेच संघटनेचे पदाधिकारी कुणाल शिंदे, एस एम इनामदार यांनी मंत्री दादा भुसे यांना निवेदन देऊन शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या प्रश्ना संदर्भात सविस्तर चर्चा केली. यामध्ये पवित्र पोर्टल २०२५ मध्ये ज्या शारीरिक शिक्षण शिक्षकांनी परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी शासन निर्णय १५ मार्च २०२४ च्या संच मान्यता निकषानुसार इयत्ता पहिली ते दहावी २५१ विद्यार्थ्यांच्या पाठीमागे एक शारीरिक शिक्षण शिक्षक व आठवी ते दहावी १५१ विद्यार्थ्यांच्या पाठीमागे एक शारीरिक शिक्षण शिक्षक पवित्र पोर्टल मध्ये यावीत. यासाठी शासकीय पातळीवरती आदेश द्यावेत असे स्पष्टपणे भूमिका मांडण्यात आली. तसेच शासनाने निर्गमित केलेला शासन निर्णय २१ ऑगस्ट २०२५ नुसार जिल्हा परिषद -केंद्र शाळा वरती एक शारीरिक शिक्षण शिक्षक नियुक्तीच्या संदर्भामध्ये मंत्रालय स्तरावरती शासकीय बैठक लावून या संदर्भामध्ये निर्णय लवकरात लवकर व्हावा अशी मागणी केली.
सेवानिवृत्त शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या रिक्त जागेवर शारीरिक शिक्षण शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी. त्यांचा कार्यभार इतर विषयाच्या शिक्षकांना देण्यात येऊ नये. हे देखील या ठिकाणी आवर्जून मुद्दा मांडण्यात आला. वास्तविक पाहता एकीकडे भारत २०३६ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धांचे यजमान पदासाठी दावेदारी करत असताना ऑलिम्पिकमध्ये भारताला पथकाची स्वप्न पडत असली तरी ती पूर्ण होण्याबाबत मात्र सांशकता आहे. कारण ग्रामीण भाग आणि प्राथमिक, माध्यमिक स्तरावर खेळाडूंची खाण असल्याचे समजण्यात येते. परंतु जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक स्तरावरील शाळांमधून खेळाडू तयार होण्यासाठी या दोन्ही स्तरावरती शारीरिक शिक्षण शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांकडे असणारे कलागुणांना वाव मिळत नाही. त्यांना खेळण्यासाठी एक व्यासपीठ तयार होत नाही. त्यामुळे ऑलिम्पिकची पदके किंवा सुदृढ समाज निर्मितीसाठी, सक्षम राष्ट्र निर्मितीसाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास निर्माण होण्यासाठी अडथळे निर्माण होत आहे. त्यामुळे या त्यामुळे हे उद्दिष्ट शासनाने पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर शारीरिक शिक्षण शिक्षकाची नियुक्ती जिल्हा परिषद केंद्र शाळा व माध्यमिक स्तरावरती पूर्ण क्षमतेने करावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे गणेश लहाने, सुनील चव्हाण, शुभम ताकीक, भले व राज्य कोर कमिटी यांच्या वतीने शासनास करण्यात येत आहे.