मुंबई : जे एस एम कॉलेज अलिबाग जिल्हा रायगड यांच्यातर्फे जीटीबी नगर येथील गुरु नानक कॉलेजात आयोजित करण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन विभाग १ योगासन स्पर्धेत मुलांच्या गटात रामानंद आर्या डी ए व्ही कॉलेजने आणि मुलींच्या विभागात यजमान गुरु नानक कॉलेज संघाने सांघिक विजेतेपद मिळवले.
वैयक्तिक स्पर्धेत मुलांमध्ये वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कॉलेजचा पार्थ कौर आणि मुलींमध्ये अण्णा लीला कॉलेजची रुही घाग पहिली आली. स्पर्धा सांघिक, वैयक्तिक अशा दोन गटात घेण्यात आल्या.
सांघिक गट स्पर्धेचा अंतिम निकाल
मुले ः १. रामानंद आर्या डी ए व्ही कॉलेज (६९५ गुण), २. विवेकानंद एजुकेशन सोसायटी कॉलेज (६८९ गुण), ३. गुरू नानक कॉलेज (६८३ गुण).
मुली ः १. गुरू नानक कॉलेज (७८१.५ गुण), २. रामानंद आर्या डी ए व्ही कॉलेज (७२४.५ गुण), ३. विवेकानंद एजुकेशन सोसायटी कॉलेज (६९३ गुण).
वैयक्तिक स्पर्धा मुले : १. पार्थ कौर (पद्मभूषण वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कॉलेज, २०२.५ गुण), २. भव्य सावला, के जे सोमय्या कॉलेज (१९०.५ गुण), ३. आदित्य दूसने (सेंट झेवियर्स कॉलेज, १८७ गुण).
वैयक्तिक स्पर्धा मुली ः १. रूही घाग (अण्णा लीला कॉलेज कॉलेज. २४७ गुण), २. सुमन केवट (गुरू नानक कॉलेज, १९७.५ गुण), ३. अक्षिता समर्थ (रामनारायण रुईया कॉलेज, १९४.५ गुण).