
७ सुवर्ण, २ रौप्य व ४ कांस्य पदकांची कमाई
मुंबई ः मिहीर सीन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, दहिसर येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत एक्सलंट तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करीत एकूण १३ पदके पटकावली. त्यामध्ये ७ सुवर्ण, २ रौप्य व ४ कांस्य पदकांचा समावेश आहे.


प्रशिक्षक गजेंद्र गवंडर व कांचन गवंडर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी स्पर्धेपूर्वी तीन सत्रांत कठोर सराव करून खेळातील तंत्र आत्मसात केले. अथक प्रयत्नांमुळे खेळाडूंनी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. विशेष म्हणजे सात सुवर्णपदक विजेत्यांची निवड विभागीय तायक्वांदो स्पर्धेसाठी झाली आहे.


या स्पर्धेत युवराज सिंग, मंथन रावत, रामकृष्णन कोनार, गुणमय चनाल, मेहेक पात्रा, अद्विक राणा, पूर्ती जैन, स्वरा मोहिते, निती वेलाणी आणि क्षितिजा पाटील या खेळाडूंनी आपल्या वजन गटात उल्लेखनीय कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले.


या यशाबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे उपाध्यक्ष व एक्सलंट तायक्वांदो अकॅडमीचे संस्थापक निरज बोरसे, राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच लता कलवार, तसेच ठाणे जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष तुकाराम म्हात्रे, उपाध्यक्ष सलील झवेरी, दीपक मालुसरे, सचिव कौशिक गरवालिया, खजिनदार सुरेंद्र कांबळी, सदस्य श्रीकांत शिवगण व प्रमोद कदम यांनी प्रशिक्षक गजेंद्र गवंडर व कांचन गवंडर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सुवर्णपदक विजेते
विवान माने, हार्दिक आर्या, प्रणिल नांदावडेकर, आदित्य सुरेंद्रन, क्रिष्णा शुक्ला, अमृता कुलकर्णी, श्रृतीका जाधव.
रौप्य पदक विजेते
श्रुती प्रग्यान साहु, ओजस्वी पानंदीकर.
कांस्य पदक विजेते
अनिकेत कुलकर्णी, सावी खोपकर, सौम्या गुप्ता, जान्हवी जंगम.