
छत्रपती संभाजीनगर ः आयसीएससीच्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या लावण्या बेडसे हिने रौप्यपदक पटकावले आहे.
जळगाव येथे झालेल्या आंतरशालेय सीआयएसइ बोर्डाच्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लावण्या बेडसे हिने दिल्ली, पंजाब, हरियाणा, मणिपूर येथील प्रतिस्पर्ध्यावर मात करीत रौप्य पदक पटकावले. तत्पूर्वी, लावण्या बेडसे हिने विभागीय पातळीवर सुवर्णपदक पटकावून पुणे येथे झालेल्या राज्यस्तरावर सुवर्णपदक पटकावले होते.
राष्ट्रीय स्पर्धेकरिता राज्याच्या संघात आपले स्थान पक्के करत राष्ट्रीय स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी बजावत तिने रौप्य पदक पटकावले. लावण्या बेडसे ही एक्सलंट तायक्वांदो अकॅडमीच्या लॉर्ड पॅराडाईज येथील शाखेत राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक अंतरा अनिल हिरे यांच्याकडे नियमित सराव करते.
लावण्या बेडसेच्या या यशाबद्दल अकादमीचे मुख्य प्रशिक्षक व राज्य संघटनेचे उपाध्यक्ष नीरज बोरसे, राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच लता कलवार, अमोल थोरात, चंद्रशेखर जेऊरकर, राजू जाधव, कोमल आगलावे, सागर वाघ, शरद पवार, प्रतीक जांभुळकर, यश हिरे, राधिका शर्मा, जयेश पठारे, श्रेया पराडकर व तिचे आई-वडील तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.