
नागपूर ः धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये आंतर महाविद्यालयीन कबड्डी जी झोन स्पर्धेत बॅरिस्टर शेषराव वानखेडे कॉलेज संघाने विजेतेपद पटकावले.
झोन फायनलचा सामना बॅरिस्टर शेषराव वानखेडे कॉलेज खापरखेडा आणि आर एस मुंडले धरमपेठ महाविद्यालय यांच्यात खेळला गेला. सामन्याच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रशांत कोठे, सिनेट सदस्य डॉ संजय चौधरी, स्पर्धा प्रमुख डॉ देवेंद्र वानखडे यांनी खेळाडूंचा परिचय करून घेतला. त्यानंतर अंतिम सामन्याला सुरुवात झाली. एस के वानखेडे कॉलेज संघाकडून कुणाल, सूरज, अमोल. यश यांची चांगली कामगिरी केली. एकवेळ धरमपेठ कॉलेज संघ १३-८ असा आघाडीवर होता. मात्र, वानखेडे कॉलेज संघाने शानदार खेळ करुन २८-२४ असा सामना जिंकून विजेतेपद पटकावले.
यापूर्वी.शेषराव वानखेडे कॉलेज संघाने शासकीय वसंतराव नाईक समाज विज्ञान संस्थेच्या संघावर २१-७ असा विजय मिळविला. तर आर एस मुंडले धरमपेठ महाविद्यालय संघाने सेंट विन्सेंट पलोटी संघावर २२-१३ गुणांनी विजय मिळविला.
या प्रसंगी डॉ सुभाष दाढे, कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक जयंत जिचकार, डॉ गोवर्धन वानखेडे, डॉ राजू राऊत, सचिन सूर्यवंशी आदी उपस्थित होते.