खो-खो स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलची विजेतेपदाची हॅटट्रिक

  • By admin
  • September 23, 2025
  • 0
  • 6 Views
Spread the love

जळगाव ः महानगरपालिकास्तरावरील आंतरशालेय खो-खो स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल संघाने सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावत हॅटट्रिक साजरी केली आहे. 

जिल्हा क्रीडा संकुलात ही स्पर्धा झाली. यामध्ये महापालिका क्षेत्रातील शाळांनी सहभाग घेतला होता. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावत एक विक्रम रचला आहे. 

विद्यार्थ्यांची कामगिरी ही सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून शाळेसाठी गौरवशाली क्षण आहे. विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहन देण्याची भूमिका व्यवस्थापनाची असल्यानेच हे यश मिळाल्याची भावना खेळाडू व प्रशिक्षकांमध्ये आहे. क्रीडा शिक्षिका श्वेता कोळी व आकाश धनगर यांनी विद्यार्थ्यांना मार्दर्शन केले. अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी यांच्यासह मनोज दाडकर, रूपाली वाघ व शिक्षिकांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *