
मनपा आयुक्त, पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा शानदार समारोप सोहळा
छत्रपती संभाजीनगर : ३१ व्या घटक पोलिस क्रीडा स्पर्धेत पोलिस मुख्यालय संघाने जनरल चॅम्पियनशिप पटकावली. या स्पर्धेचा समारोप एका शानदार सोहळ्यात झाला.
या स्पर्धेच्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मनपा आयुक्त जी श्रीकांत हे उपस्थित होते. तसेच पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस उपायुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी यावेळी मंचावर उपस्थित होते.
ही स्पर्धा १९ ते २२ सप्टेंबरदरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. शहर विभाग, पोलिस मुख्यालय विभाग, छावणी विभाग, सिडको विभाग आणि उस्मानपूरा विभाग अशा पाचही विभागांनी यात सहभाग घेतला होता. समारोप प्रसंगी विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यामध्ये पोलीस मुख्यालय संघाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत जनरल चॅम्पियनशिप पटकावली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख असिफ यांनी केले. संपूर्ण स्पर्धेचे आयोजन व नियोजन पोलीस उपायुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. यामध्ये प्रल्हाद राठोड, सदाशिव मुत्याळ, नारायण पुरके, क्रीडा प्रमुख राजेंद्र घुनावत व विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यात संभाजी पवार, गजानन कल्याणकर, गणेश ताठे, अतुल येरमे, शिवचरण पांढरे, गोकुळ कुत्तरवाडे, राजेंद्र चौधरी, संदीप पाटील, क्रीडा विभाग प्रमुख शेख असिफ यांचा समावेश आहे.