
सेलू ः आंतर शालेय जिल्हास्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेत सेलू येथील नूतन विद्यालय संघाने वर्चस्व गाजवत घवघवीत यश संपादन केले.
जिल्हा अधिकारी कार्यालय परभणी, नूतन विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन विद्यालय इनडोअर क्रीडा हॉलमध्ये शालेय जिल्हा सेपक टकरॉ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन नूतन संस्था सचिव डॉ व्ही के कोठेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष डॉ एस एम लोया, प्रमुख पाहुणे संस्था सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, पर्यवेक्षक रोहिदास मोगल, डी डी सोन्नेकर, मुख्याध्यापक देशपांडे, जिल्हा सचिव गणेश माळवे, तालुका क्रीडा संयोजक प्रशांत नाईक आदी उपस्थित होते.
शालेय जिल्हा ग्रामीण क्रीडा स्पर्धेत १४, १७, १९ वर्षांखालील मुले-मुली असे एकूण ३२ संघांतील १६० खेळाडू सेलू, पाथरी, जिंतूर, गंगाखेड, पूर्णा या तालुक्यातून सहभाग नोंदवला. या स्पर्धेत पंच म्हणून संजय भुमकर, किशोर ढोके, अनुराग आंबटी, कुणाला चव्हाण, सत्यम बुरकुले, सुरज शिंदे, जुलाह खुदुस, केंद्रे पांडुरंग, प्रमोद गायकवाड, दीपक जोरगेवार यांनी काम पाहिले.
अंतिम निकाल
१४ वर्षे मुले : १. नूतन विद्यालय सेलू, २. प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू, ३. व्हिजन इंग्लिश स्कूल सेलू. १४ वर्षे मुली : १. नूतन विद्यालय सेलू,२. ज्ञानतीर्थ विद्यालय सेलू, ३. एस एन व्ही पाथरी.
१७ वर्षे मुले :१. नूतन विद्यालय सेलू, २. ब बी नूतन इंग्लिश स्कूल सेलू, ३. प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू. १७ वर्षे मुली : १. नूतन विद्यालय सेलू, २. नूतन कन्या प्रशाला सेलू, ३. प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू.
१९ वर्षे मुले : १. नूतन महाविद्यालय सेलू, २. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालय, पाचलेगांव जिंतूर, ३. कला व वाणिज्य महाविद्यालय गंगाखेड. १९ वर्षे मुली : १. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालय पाचलेगांव जिंतूर, २. नूतन कन्या प्रशाला सेलू, ३. कला व वाणिज्य महाविद्यालय गंगाखेड.