
छत्रपती संभाजीनगर ः पोलीस क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत आणि पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते जलतरण साक्षरता संकल्पना राबवणारे राजेश भोसले यांचा सत्कार करुन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी जलतरण साक्षरता अंत्यत आवश्यक असून शहरात किमान पाच स्विमिंग पूल बांधण्यात येणार असल्याचे सांगून जलतरण साक्षरता राबवत असल्यामुळे राजेश भोसले यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.