
नंदुरबार ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार, नंदुरबार जिल्हा स्विमिंग असोसिएशन व वर्ल्ड वाईड स्पोर्ट्स क्लब नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेचे आयोजन बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव, नंदुरबार येथे करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून नगरपालिकेचे माजी सभापती कैलास पाटील, वर्ल्ड वाईड स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळते, महाराष्ट्र स्कॉश संघटनेचे अध्यक्ष दयानंद कुमार, माजी क्रिकेटपटू दादाभाई मिस्तरी, जगदीश बच्छाव, जिल्हा क्रीडा कार्यालयाचे प्रशिक्षक भगवान पवार, मुकेश बारी, क्रीडा शिक्षक डॉ मयूर ठाकरे, वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष प्रवीण गिरासे, क्रीडा शिक्षक भरत चौधरी, मनीष सनेर, संदीप पाटील, शांतराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेतील विजेते खेळाडू नाशिक विभागीय शालेय जलतरण स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यावेळी मार्गदर्शन करताना शालेय स्पर्धेतून विद्यार्थ्यांना जलतरण खेळात संधी आहे त्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागातील खेळाडूंमध्ये असणारी ऊर्जा व अथक परिश्रम करून खेळात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी खेळाडूंना केले.
नंदुरबार जिल्ह्याच्या संघामध्ये ऋषिराज प्रधान, हर्षित पराडके, दक्ष बारी, शेखर वळवी, यशवंत पाटील, कपिल पाडवी, संस्कृती माळी, हर्षिता साठे, अक्षरा पाटील, आदित्य पिंपळे, निर्मल आरंभी, दर शहा, वेदांत राजपूत, सागर वसावे, मनोहर वळवी, यश राजपूत, करण राठोड, कौस्तुभ गिरणार, तनुश्री पिंपळे, कुशवंत पाटील, रामदास वसावे, अजय भिल, नैनश ठाकरे, पंकज वडार यांची निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी काळे सर, रायरेश्वर चौधरी, जगदीश वंजारी, संदीप पाटील, योगेश माळी आदींनी परिश्रम घेतले.