
छत्रपती संभाजीनगर ः मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियम मुंब्रा मुंबई येथे २१ सप्टेंबर रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य कराटे आणि किक बॉक्सिंग स्पर्धेत शेख हम्माद याने किक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आपला दबदबा कायम ठेवला.
अंतिम फेरीत शेख हम्माद याने ठाणे जिल्ह्याच्या अब्दुल्ला चौरलिया याला आपल्या अष्टपैलू खेळाने हरवून सुवर्णपदक पटकावले. हम्मादची अष्टपैलू खेळी बघून स्टेडियममध्ये सर्वत्र हम्मादची चर्चा झाली. या कामगिरीबद्दल सामन्याचे आयोजक याकूब शिहान सर, सय्यद अफसर सर, इंटरनॅशनल फायटर मास्टर आरिफ सर, ७२ सिक्रेट कुंग फू असोसिएशन ऑफ इंडिया यांनी त्याचे कौतुक केले.
शेख हम्माद हा झेड एस वॉरियर्स अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. तसेच तो न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूल येथे इयत्ता पाचवी वर्गात शिक्षण घेत आहे. झेड एस वॉरियर्स अकॅडमीचे अध्यक्ष सय्यद जहूर अली व सचिव रिझवान अली, प्रशिक्षक अजिंक्य नितनवरे यांनी हम्मादचे अभिनंदन केले. तसेच न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर सुम्मया मॅडम आणि मुख्याध्यापिका नखिया मॅडम व अल फरहाद वेलफेअर अँड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अब्दुल मुकित अली व सहसचिव फरहत समरीन यांनी त्याचे कौतुक केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.