
परतूर (विकास काळे) ः जालना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आणि जालना जिल्हा सॉफ्टटेनिस असोसिएशन यांच्या तांत्रिक सहकार्याने आयोजित जिल्हास्तरीय शालेय सॉफ्टटेनिस स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल जालना येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
या स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षांखालील मुला–मुलींच्या गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आपले कौशल्य दाखवून प्रेक्षकांची मने जिंकली.
या स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात हेमांशु कदम, ओम पंडित, कुलदीप खरात, आदित्य अंभुरे, समर्थ गोसावी यांनी विजय नोंदवले. मुलींच्या गटात सोनम पाबळे, कल्याणी पवार, अरुंधती कदम, अर्पिता जाधव, समीक्षा पंडित यांनी विजय साकारले आहेत.
१७ वर्षाखालील गटात सत्यजित शेवाळे, पार्थ बागल, ध्रुव मुसळे, श्रेयस कोल्हे, हरी भोपळे हे विजयी झाले. मुलींच्या गटात प्रिया हरजुळे, श्रावती पाईकराव, श्रावणी पतंगे, समृद्धी प्रधान, जिविका खंदारे यांची कामगिरी लक्षवेधक ठरली.
१९ वर्षांखालील गटात अपूर्वा मानवतकर, संस्कृती देवरे, श्रावणी लोहगावकर, मयुरी कोल्हे, मोनिका तोर यांनी विजय साकारले.
विजयी खेळाडूंना सॉफ्ट टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष शत्रुघ्न कणसे, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय गाढवे, क्रीडा अधिकारी लता लोंढे, संघटना सचिव विकासराव काळे, पदाधिकारी प्रमोद खरात, एकनाथ सुरुशे, सोपान शिंदे, संदीप सानप आणि योगेश ताकमोघे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेमुळे जालना जिल्ह्यातील सॉफ्ट टेनिस खेळाडूंना विभागीय, राज्यस्तरीय स्पर्धेत कौशल्य दाखवण्याची प्रेरणा मिळाल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले.