जळगाव ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव आणि एकलव्य क्रीडा संकुल तसेच जळगाव जिल्ह्या सेपक टकरॉ असोसिएशनच्या सहकार्याने जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन पोलीस उप अधीक्षक नितीन गणपुरे, पीआय जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे ठाकूर, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, डॉ श्रीकृष्ण बेलोरकर, रणजीत पाटील, किशोर चौधरी यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. जिल्हा अध्यक्ष एजाज मलिक, डॉ प्रदीप तळवेलकर, इकबाल मिर्जा यांनी पाहुण्याचे स्वागत केले. आसिफ मिर्झा व राष्ट्रीय व विद्यापीठ खेळाडू यांनी स्पर्धा यशस्वी केली.



