नांदेड येथे गणपतराव मोरगे स्मृती बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न
नांदेड ः नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या गणपतराव मोरगे स्मृती अंडर १९ राज्यस्तरीय फिडे मानांकन निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत दीशांक बजाज, श्रेया हिप्परगी यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकावले. सानी देशपांडे व अर्णव कदम यांनी उपविजेतेपद संपादन केले.
एच टू इ पावर सिस्टीम महाराष्ट्र राज्य ज्युनिअर अंडर १९ ओपन व गर्ल्स फिडे रेटिंग सिलेक्शन चेस चॅम्पियनशिप स्पर्धा सक्षम चेस अकॅडमी नांदेड यांच्या वतीने तसेच नांदेड जिल्हा चेस अँड रॅपिड चेस असोसिएशन नांदेड, महाराष्ट्र चेस असोसिएशन, एआयसीएफ व फिडे यांच्या मान्यतेने नॉलेज रिसोर्स सेंटर (लायब्ररी हॉल) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे संपन्न झाली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर हे उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीमध्ये प्र-कुलगुरू डॉ अशोक महाजन, प्र-कुलसचिव डॉ डी डी पवार, प्रभारी क्रीडा संचालक डॉ भास्कर माने, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ साहेबराव मोरे, डॉ सुहास पाठक, डॉ एम के पाटील, डॉ जे एन कुलकर्णी, डॉ मारुती गायकवाड, चांदणे, बुद्धिबळ संघटना सचिव डॉ दिनकर हंबर्डे, नितीन शेणवी, मीतला शेणवी, सक्षम चेस अकॅडमीच्या संचालिका सुचिता हंबर्डे, रवी जनवाडे व सक्षम हंबर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांच्या हस्ते सहाव्या फेरीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी साहित्यिक डॉ पी विठ्ठल, विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर हे उपस्थित होते. तसेच विविध मान्यवरांनी स्पर्धेच्या काळात भेट दिली. त्यात डॉ वैजयंता पाटील, डॉ अशोक गिनगिने, प्राचार्य प्रवीण कुमार, फादर मुथुस्वामी, डॉ आशय देशमुख, स्वाती वाकोडे, डॉ श्रीनिवास चव्हाण, डॉ विपिन भांगडिया, गजानन पावडे आदी मान्यवरांचा समावेश आहे.
स्पर्धेचा अंतिम निकाल
१९ वर्षांखालील मुले ः १. दीशांक बजाज (नागपूर), २. अर्णव कदम (पुणे). मुलींचा गट ः १. श्रेया हिप्परगी (सांगली), २. सानी देशपांडे (छत्रपती संभाजीनगर).
१९ वर्षांखालील ओपन एक ते दहा क्रमांकाचे खेळाडू ः दिशांक बजाज (नागपूर), अर्णव कदम (पुणे), निहाण पोहाणे (चंद्रपूर), राम परब (मुंबई), निशांत जवळकर (पुणे), साई शर्मा (नागपूर), चव्हाण आदित्य (सांगली), क्षितिज प्रसाद (पुणे), शरणार्थी श्लोक (पुणे), सुदीप पाटील (छत्रपती संभाजीनगर).
मुलींचा गट ः श्रेया हिप्परगी (सांगली), सानी देशपांडे (छत्रपती संभाजीनगर), गावंडे देवांशी (अकोला), पाटील दिशा (कोल्हापूर), श्रद्धा बजाज (नागपूर), पाटील दिव्या (कोल्हापूर), रितिका गमे (नागपूर), मानसी (पुणे), वागळे भूमिका (छत्रपती संभाजीनगर), कीर्ती पटेल (मुंबई सिटी).
मराठवाड्यातील गुणवंत खेळाडू
मुलांचा गट : शिवांश निरणे, शर्विल कोकणे, निकुंज उप्पला, हर्ष साबळे, शौर्य मुप्पानेनी, पियुष माने, जयदीप इबितवार, रियांश घंटे, सक्षम पवार, वरद पैंजण, देवांश चव्हाण, अर्णव तोष्णीवाल, वेदांश भांगडिया, अक्षित विडेकर, वेदांश चव्हाण, आदित्य जटाळे, प्रथमेश सुतार, शुभम केंद्रे, प्रसन्नजीत नायक, आर्यन सोनवणे, पैदापल्ली अर्णव, ऋग्वेद पोतदार, रणधीर बनकर, वरद बोकारे, अर्णव कानडे, पारेकर वैभव, ओमकार जाधव, करवा व्यंकटेश व अर्णव तोतला.
मुलींचा गट ः अंशिका अवरदे, संचिता सावंत, आराध्या धोंगडे, वरलक्ष्मी तेहरा, स्वरा जाधव, गौरी मंत्री, द्रिती धोंडे, भक्ती गवळी, वसमतकर अनुश्री, खुशी माने, हर्षिता भोसले, रेवा तौर, घाटगे सह्याद्री, वीरा तेहरा, शर्विया दरेवार, गार्गी संघी, ओवी पवार, ऋतुजा कदम, सान्वी निकम, सांची भवरे, प्रांजल वाघमारे, काटले समृद्धी, विशुद्धी कांबळे, सृष्टी केंद्रे, कांबळे समृद्धी व अवनी कापसे.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नांदेड जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ साहेबराव मोरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ दिनेश चव्हाण यांची उपस्थिती होती. या स्पर्धेचे सूत्रसंचालन सृजन नांदेडे यांनी केले. सचिव डॉ दिनकर हंबर्डे यांनी आभार मानले.
उत्तेजनार्थ पारितोषिक विविध वयोगटातील एक ते दहा क्रमांकाच्या खेळाडूंना देण्यात आले. तसेच सर्वोत्कृष्ट एक ते पाच क्रमांक चेस अकॅडमी व नांदेड शहरातील शाळा यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये ज्ञानमाता विद्या विहार, ई टेक्नो नारायणा स्कूल, पोद्दार स्कूल, गुजराती हायस्कूल व केंब्रिज हायस्कूल नांदेड आणि अकॅडमी मध्ये प्रथम सक्षम चेस अकॅडमी नांदेड, द्वितीय माईंड्स वॉरियर अकॅडमी नांदेड तृतीय सागर चेस अकॅडमी भंडारा, चतुर्थ श्री चेस अकॅडमी सिंधुदुर्ग व पाचवा समर्थ चेस ॲकॅडमी परभणी यांचा समावेश आहे.



